वांग्याचे कुरकुरीत काप

वांग्याचे कुरकुरीत काप

Vangyache Kaap – Crispy Brinjal/Eggplant Fritters – Shallow Fried Brinjal Slices

वांग्याचे काप, वांगी, तोंडीलावणी, स्नॅक्स, vangyache kaap, eggplant fries, brinjal fritters, zesty flavours
वांग्याचे नाव घेतले की वांग्याचे भरीत, वांगी-बटाटा रस्सा याबरोबरचआणखी एक पदार्थ आठवतो तो म्हणजे वांग्याचे काप. हे कुरकुरीत, खमंग काप तोंडी लावायला असले की मस्त बेत जमतो. वांग्याचे काप थोड्या फार फरकाने भारतात वेगवेगळ्या प्रांतात केले जातात. कोकण, गोवा साइडला हे काप – कापं या नावाने ओळखले जातात, तर बंगालमध्ये हे वांग्याचे काप ‘बेगुन भाजा’ होतात. वांग्याचे काप अगदी पटकन होणारे आणि करायलाही सोपे आहेत. यासाठी जे मसाले आणि पीठं लागतात, ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता.
वांग्याचे काप, भरताची वांगी, वांगे, vangache kaap, brinal, eggplant, bharta baingan, zesty flavours

 

साहित्य –
2 मोठी (भरताची) वांगी
शॅलो फ्राय करायला तेल
मसाला – 1
1 – 2 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून हळद
थोडसं मीठ
मसाला – 2
1/2 कप डाळीचे पीठ (बेसन)
2 टेस्पून रवा
1 टेस्पून ज्वारीचे किंवा तांदळाचे पीठ
1/2 टीस्पून गरम मसाला
मीठ (आधी लावलेले लक्षात घेऊन)

कृती –
वांगी स्वच्छ धुऊन त्याच्या चकत्या करा.
अगदी पातळही नाही आणि जास्त जाडही न करता मध्यम करा.

वांग्याचे काप, वांगी, तोंडीलावणी, vangyache kaap, baingan fry, sides, brinjal, eggplant


आता वांग्याच्या या कापांना एक नंबरचा मसाला लावा.
हळद, तिखट आणि मीठ वांग्याच्या कापांना दोन्ही हातांनी  लावा.
हा मसाला वांग्याच्या प्रत्येक चकतीला व्यवस्थित कोटिंग होईल अशा पद्धतीने लावा.

वांग्याचे काप, मसाला, वांगी, तोंडीलावणी, vangyache kaap, baingan fry, eggplant
वांग्याचे काप, मसाला, वांगी, तोंडीलावणी, baingan fry, begun bhaja

15 मिनिटे हे काप झाकून ठेवा.

दोन नंबरच्या मसाल्याचे सगळे साहित्य मिक्स करा.
वांग्याचे काप, मसाला, वांगी, तोंडीलावणी, baingan fry, begun bhaja, eggplant fritters

15 मिनिटांनी या कापांना दोन नंबरचा मसाला चोळून घ्या.
हाही मसाला वांग्याच्या कापांना नीट सगळीकडे लागेल अशा पद्धतीने लावा.

वांग्याचे काप, वांगी, मसाला, तोंडीलावणी, baingan fry, begun bhaja, eggplant fries
वांग्याचे काप, वांगी, मसाला, तोंडीलावणी, baingan fry, begun bhaja, eggplant fries

तव्यावर किंवा पॅनमध्ये 2 – 3 टेस्पून तेल गरम करा.
तेल गरम झाले की वांग्याचे काप तव्यावर शिजायला ठेवा.

वांग्याचे काप, वांगी, तोंडीलावणी, vangyache kaap,baingan fry, begun bhaja, eggplant fry

झाकण ठेऊन 5 – 7 मिनिटे शिजवा.

वांग्याचे काप, वांग्याची भाजी, वांगी, तोंडीलावणी, baingan fry, begun bhaja, eggplant fries

एक बाजू शिजली की उलटून दुसर्‍या बाजूने कुरकुरीत करा.

वांग्याचे काप, वांग्याची भाजी, वांगी, तोंडीलावणी, baingan fry, begun bhaja, eggplant, brinjal fries

गरम गरम वांग्याचे काप खायला तयार आहेत.

असेच सगळे काप करा.

वांग्याचे गरम गरम काप तोंडीलावणे म्हणून छानच लागतात.
वरण भात, खिचडी किंवा दही भाताबरोबर हे काप खायला मजा येते.
स्नॅक्स म्हणून तुम्ही नुसतेही खाऊ शकता.

Vangyache Kaap Recipe in English

 

Ingredients –
2 large eggplants
Oil for shallow frying
Masala – 1
1 – 2 tsp red chili powder
1 tsp turmeric
A little salt
Masala – 2
1/2 cup besan (gram flour)
2 tbsp semolina
1 tbsp sorghum(jowar flour) or rice flour
1/2 tsp Garam Masala
Salt (taking into account the earlier mentioned)
Directions –
Wash the eggplant clean and make slices.
Don’t make it too thin or too thick.
Now add all the spices under masala – 1 to these eggplant slices.
Coat the eggplant slices with turmeric, red chilli powder and salt. Mix well with both hands.
Cover and keep aside for 15 minutes.
Mix all the ingredients under masala – 2.
After 15 minutes, coat masala number two on these slices.
Make sure to spread the masala evenly on the eggplant slices.
Heat 2 – 3 tbsp of oil in a tawa or pan.
Once the oil is hot, cook the eggplant slices on a tawa.
Cover and cook for 5-7 minutes.
When one side is cooked, turn it over and crisp the other side.
Mouth watering savoury and crispy eggplant fries are ready to eat.
Prepare all the Vangyache Kaap – Eggplant Fritters/Fries in such a way.

Leave a Reply