5 प्रकारचा सोपा आणि पटकन होणारा पुदिना पराठा

5 प्रकारचा सोपा आणि पटकन होणारा पुदिना पराठा

Pudina Paratha Recipe (5 Ways) – Mint Flavoured Indian Flatbread Recipe

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठे रेसिपी, पुदिना रेसिपी, नाश्ता रेसिपी, ब्रेकफास्ट रेसिपी, pudina paratha recipe, paratha recipe, breakfast recipe,
आज मी तुमच्यासाठी पुदिना पराठ्याची खास रेसिपी घेऊन आले आहे. हा पुदिना पराठा चवीला खूप छान आणि खुसखुशीत लागतो. मला स्वत:ला पुदिन्याचा स्वाद खूप आवडतो. कोणत्याही पदार्थात पुदिना घातला तर पुदिन्याची ती मस्त चव, तो वास आणि त्याचबरोबर पुदिन्याचे औषधी फायदेही मिळतात. पुदिन्याच्या पाचक गुणधर्मामुळे कोणत्याही पचायला जड असणार्‍या पदार्थात पुदिना घातला तर तो पदार्थ पचायला हलका होतो. याआधी मी पुदिना लिंबू सरबताची रेसिपी शेअर केली होती. उन्हाळ्यात हे सरबत प्यायला खूप छान वाटतं.

हे पुदिना पराठेसुद्धा पुदिन्याच्या चवीमुळे खूप स्वादिष्ट लागतात. कोणत्याही भाजीबरोबर आपण हे पराठे खाऊ शकतो.
पण तसेही फ्लेवर्ड पराठे असल्यामुळे भाजी नसली तरी चालतं. चटणी, लोणचं, साॅस यापेकी काहीही बरोबर घेऊ शकता. त्यामुळे डबा असो की ब्रेकफास्ट किंवा जेवण सगळ्यासाठी पुदिना पराठा हे बेस्ट आॅप्शन आहे.
या रेसिपीत मी तुम्हाला पराठा लाटण्याच्या 5 वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे. तुम्ही यापेकी कोणत्याही पद्धतीने पराठे करू शकता. शिवाय पुदिना पराठाचं असं नाही, तर सारण न भरता आपण जे जे पराठे करतो ते यापैकी कोणत्याही पद्धतीने करता येतील.

पराठ्याचे काही प्रकार –
मिक्स व्हेज पराठा

साहित्य –
1/2 कप गच्च भरून पुदिन्याची पाने
2 ते 2 1/2 कप कणिक
4 – 5 लसणीच्या पाकळ्या
4 – 5 हिरव्या मिरच्या
1 इंच आले
1 टे स्पून तीळ
1 टीस्पून ओवा
चवीप्रमाणे मीठ
तेल

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी, पुदिना रेसिपी, नाश्ता रेसिपी, ब्रेकफास्ट रेसिपी, pudina paratha recipe marathi, paratha recipe marathi

कृती –
पुदिना निवडून पाने स्वच्छ धुऊन घ्या.
पुदिन्याची पाने, आलं, लसूण आणि मिरच्या पाणी न घालता वाटून घ्या.
कणकेत हा ठेचा, तीळ आणि ओवा घालून मिक्स करा.
चवीपुरते मीठ आणि लागेल तसे पाणी घालून खूप सैल नाही पण मऊ कणिक भिजवा.
हातावर थोडेसे तेल घेऊन ते कणकेच्या गोळ्याला सगळीकडे लावा.
अर्धा तास कणिक झाकून ठेवा.

1. साधा गोल पराठा –

भिजवलेल्या कणकेचा एक गोळा घेऊन घड्या न घालता गोल पराठा लाटा.
फुलके किंवा ठेपले लाटतो तसा लाटा.
तवा गरम करून पराठा भाजा.
भाजताना पराठ्याला खालीवर दोन्ही बाजूंनी तेल लावा.

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना रेसिपी, नाश्ता रेसिपीज, ब्रेकफास्ट रेसिपीज, pudina paratha recipe marathi, paratha recipe marathi, healthy breakfast, indian breakfast recipe

2. गोल पराठा (प्रकार – 2) –
कणकेचा एक गोळा घेऊन थोडा उभट पराठा लाटा.
बरोबर मध्ये चिमटा घेऊन दोन भाग करा.
पराठ्याचा आकार पूर्ण उघडलेल्या शिंपल्यासारखा दिसेल.
आता हे दोन्ही भाग एकावर एक दाबून बंद करा.
हलक्या हाताने गोल पराठा लाटा.

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना रेसिपीज, हेल्दी ब्रेकफास्ट, नाश्ता रेसिपी, pudina paratha recipe marathi, paratha recipe marathi, healthy breakfast, indian breakfast

 

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपीज, पुदिना रेसिपीज, नाश्ता, ब्रेकफास्ट, pudina paratha recipe marathi, paratha recipe, indian breakfast recipe

3. त्रिकोणी पराठा –
कणकेच्या गोळ्याची थोडी मोठी पोळी लाटा.
या पोळीला तेल लावा.
पोळीची वरची बाजू खाली करून मधोमध आडवी घडी करा.
परत एकदा या घडीवर तेल लावा.
पुन्हा मधोमध दूमडून त्रिकोणी आकार करा
नेहमीसारखी घडीची पोळी करतो तसा हा पराठा लाटायचा आहे.
फक्त चार घड्या घातल्यावर गोल पोळी न करता तसाच त्रिकोणी आकार लाटा.

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, pudina paratha marathi recipe, paratha recipe marathi, paratha recipes
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिन्याच्या रेसिपीज, pudina paratha recipe marathi, paratha recipes, pudina paratha
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, हेल्दी टिफीन रेसिपी, pudina paratha recipe marathi, pudiana paratha, paratha recipe, healthy nashta recipes


4. चौकोनी, पाकिटाच्या आकाराचा पराठा –

कणकेच्या गोळ्याची मोठी पोळी लाटा.
या पोळीला तेल लावा.
पोळीचा डावीकडचा भाग उभा, अर्धा दुमडा.
आता उजवीकडचा भाग तसाच दुमडून थोडा डावीकडच्या भागावर येईल असे बघा.
परत पराठ्याला वरून तेल लावा.
आता खालचा भाग मध्यापर्यत दुमडा.
पुन्हा वरचा अर्धा भाग खालपर्यंत दुमडा.
आता हा चौकोनी पाकिटासारखा आकार तयार होईल.
हा पराठा असाच चौकोनी आकारात लाटून घ्या.
तेल सोडून भाजा.

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी, पुदिना पराठा, pudina paratha recipe marathi, pudina paratha
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी,  हेल्दी नाश्ता, हेल्दी ब्रेकफास्ट, मुलांचा हेल्दी डबा, pudina paratha recipe marathie
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, pudina paratha recipe marathi, paratha recipe marathi, pudina paratha, healthy nashta recipes, tiffin recipes indian,
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पौष्टिक नाश्ता रेसिपी, हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी, pudina paratha recipe marathi, paratha recipe marathi, pudina paratha, paratha recipes, indian brakfast recipe

5. लच्छा पराठा किंवा लेअर्ड पराठा –
लच्छा या शब्दाचा अर्थ लेअर्स किंवा पापुद्रे असा होतो.
यात पराठा लाटताना आपण ज्या विशिष्ट पद्धतीने घड्या घालतो त्यामुळे पराठ्याला भरपूर पापुद्रे सुटतात.

पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, पराठा रेसिपी, लच्छा पराठा, pudina paratha recipe marathi, lachha paratha, pudina paratha
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, पराठा रेसिपी, लच्छा पराठा, pudina paratha recipe marathi, pudiana paratha, paratha recipe, lachha paratha
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पराठे रेसिपी मराठी, पुदिना पराठा, पराठा रेसिपी, लच्छा पराठा, pudina paratha recipe marathi, pudina paratha, paratha recipe, lachha paratha
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, पराठे रेसिपी मराठी, पराठा रेसिपी, pudina paratha recipe marathi, pudina paratha, paratha recipe, lachha paratha
पुदिना पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा, पराठे रेसिपी मराठी, पराठा रेसिपी, pudina paratha recipe marathi, pudina paratha, paratha recipe, lachha paratha, paratha recipe marathi
 
तुम्हाला जितका मोठ्या आकाराचा पराठा हवा असेल तेवढी मोठी पोळीलाटा.

या पोळीला तेल लावा.
कागदाचा ओरिगामी फॅन तयार करताना आपण जश्या एक उलट आणि एक सुलट या पद्धतीने घड्या घालतो तश्या घड्या करा.
पोळीच्या खालच्या बाजूने सुरू करून वरपर्यंत घड्या करा.
आता ही घड्या केलेली बाजू वर येईल अशा पद्धतीने हा रोल पोळपाटावर ऊभा ठेवा.
नंतर वळवून घड्या असतील ती बाजू डावीकडे घ्या.
आता या रोलची गोल चक्रासारखी गुंडाळी करा.
गुंडाळी केल्यावर शेवटचे टोक दाबून पक्के करा.
हा गोल घड्या वरच्या बाजूला येतील असा ठेवा.
किंचीत दाबून हलक्या हाताने लाटा.
तेल सोडून तव्यावर भाजून घ्या.
नीट आयडिआ येण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ बघा

 

या पाच पद्धतींपैकी तुम्हाला हव्या त्या रितीने पराठे करा.

गरम पराठे दही आणि लोणच्याबरोबर खा.

Pudina Paratha Recipe in English(5 Ways)

पुदिना पराठा मराठी रेसिपी, पुदिना पराठा कसा करायचा, पराठा रेसिपीज मराठी, नाश्ता रेसिपीज, हेल्दी ब्रेकफास्ट, pudina paratha recipe in marathi, paratha recipes marathi, healthy indian breakfast
पुदिना पराठा मराठी रेसिपी, पराठा रेसिपी मराठी, पुदिना पराठा पाककृती, हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी, मुलांसाठी पौष्टिक डबा, टिफीनसाठी हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज
Ingredients –
1/2 cup tightly packed mint leaves
2 to 2 1/2 cups whole wheat flour
4 – 5 cloves of garlic
4 – 5 green chillies
1 inch ginger
1 tsp sesame seeds
1 tsp carom seeds
Salt to taste
Oil
Directions –
Take out mint leaves from the bunch and wash the leaves clean.
Grind mint leaves, ginger, garlic and chilli in a chutney jar without adding water.
Add this paste, sesame seeds and carom seeds to the dough and mix well.
Add salt and water as required and knead the soft dough.
Take a little oil on your palm and spread it all over the dough.
Cover the dough for half an hour.
 
1. Simple Round Paratha –
Take a ball of the dough and roll a round paratha without folding.
Just roll it in a circle like the way we use to make phulka or thepla.
Heat a pan or tawa and fry paratha.
While frying, spread some oil on both the sides of paratha.
2. Round Paratha (Type – 2) –
Take a ball of dough and roll an oval shape paratha.
Pinch this paratha with your fingers in the centre.
The shape of the paratha will look like a fully opened shell.
Now put both the parts on each other and flatten little by hand.
Slightly roll the paratha in a circle shape.
 
3. Triangular Paratha –
For making triangular shape paratha, firstly roll the circle paratha.
Spread some oil all over the paratha.
Fold the top of the paratha horizontally in the middle.
Once again, apply some oil on this part.
Fold in the middle again and make a triangular shape
Now roll this triangular shape to the required size.
Roast this Paratha on a preheated pan.
Apply some oil on both the sides of paratha.
 
4. Square, Envelop shaped paratha –
Firstly, roll a paratha in a large round shape.
Apply some oil on it.
Now put the left side of the paratha vertically in the centre, folded in half.
Now fold the right side in the same way and see that it comes a little to the left side.
Grease the paratha again.
Now fold the bottom to the middle.
Same way fold the upper side of the paratha.
Now it will form a square envelope shape.
Roll this paratha into a square shape.
Put some oil and roast the paratha.
 
5. Lachha Paratha or Layered Paratha –
The word lachcha means layers.
The special way in which we fold the paratha while rolling it gives a lot of layers to the paratha.
Roll the paratha in a large round shape as required.
Spread some oil all over the paratha.
Now fold up this paratha from the bottom as the way we use to make origami paper fan.
Start at the bottom and fold up in a small layers.
Now place this roll vertically on the rolling board and keep the folded side facing up.
Now turn around this shape and make sure that the upper part of the folds comes on the left side.
Now roll this shape tightly and make a circle or wheel.
When wrapped, press the end to make it firm.
Keep the round folds at the top.
Roll the paratha without giving much pressure.
Put some oil and fry on a pan.
Take a look at the photos and videos to get an  idea.
Make parathas any of the 5 ways as mentioned above.
Enjoy hot Parathas with curd and pickle.

2 thoughts on “5 प्रकारचा सोपा आणि पटकन होणारा पुदिना पराठा

Leave a Reply