आंबट – गोड – तिखट मेथांबा

Methamba Recipe Marathi – Sweet Mango Pickle Using Fenugreek Seeds

मेथांबा रेसिपी मराठी, मेथांबा, कैरीचे लोणचे रेसिपी, गोड लोणचे रेसिपी, कैरी का अचार, अचार रेसिपीज, methamba recipe english, achar recipes, pickle recipes

आमच्याकडे अजून महिनाभर तरी उन्हाळ्याची चैन आहे. परवा ग्रोसरी करायला गेले होते, तेव्हा आत गेल्या गेल्या समोरच आंब्यांचा ढिग रचला होता. कधी आंबे, कधी ब्लूबेरीज तर कधी स्ट्राॅबेरीज अशा रितीने मांडून ठेवले असतात की जाता जाता एक – दोन पॅकेटस् घ्यायचा मोह झालाच पाहिजे. (हे खरं मार्केटिंग).

परदेशातल्या ग्रोसरी शाॅपमध्ये ज्या प्रकारचे ढबोले आंबे मिळतात. ते धड आंबे म्हणायच्या लायकिचे नसतात ना धड आंबट, करकरीत कैर्‍या असतात. मऊ पडलेल्या, आतून पिवळ्या झालेल्या कैरीसारखे चवीला लागतात. मी त्याचा उपयोग आंबे म्हणून करण्यापेक्षा कैरीसारखा करते. मेथांबा, कैरीचा कायरस, सार असे गूळ घालून कैरीचे आपण जे जे प्रकार करतो ते मी करते. फक्त यात मग गूळ अगदी नावाला घालायचा किंवा अजिबात घातला नाही तरी चालतो. आंबे वरून दिसायला हिरवेच असतात. शिवाय हे हातालाही चांगले कडक लागत होते. मग तर घेतल्याशिवाय रहावलंच नाही. बघू कसे निघतात ते असा विचार करून दोन घेतलेच. त्यातल्या एका आंब्याचा मेथांबा केला. त्याची ही कृती.

साहित्य –
1 अगदी मोठी कैरी
(चिरून 2 कप फोडी होतील इतकी)
2 टेस्पून गूळ (कैरीचा आंबटपणा आणि तुमच्या गोडाच्या चवीनुसार)
1 टेस्पून तेल
1 टी स्पून मोहरी
2 टीस्पून मेथी दाणे
1 टीस्पून लाल तिखट
हिंग
हळद
मीठ

मेथांबा रेसिपी मराठी, कैरीचे लोणचे, लोणचे रेसिपी, कैरी का अचार, अचार रेसिपीज, methamba recipe marathi, achar recipes, kairi ka achar
मेथांबा रेसिपी मराठी, कैरीचे लोणचे, लोणचे रेसिपी, गोड लोणचे, कैरी का अचार, kairi ka achar, achar recipe, methamba recipe english, methamba recipe marathi
मेथांबा रेसिपी मराठी, कैरीचे लोणचे, लोणचे रेसिपीज, kairi ka achar, methamba recipe marathi, achar recipes
कृती –
कैरीची सालं काढून लहान लहान फोडी करा.

तेल गरम करायला ठेवा.
तेल तापले की मोहरी घाला.
मोहरी तडतडली की हिंग आणि मेथ्या घाला.
मेथी दाणे करपू न देता पटकन परतून घ्या.
मेथी नीट तळली गेली की त्यावर हळद घालून कैरीच्या फोडी घाला.
एक वाटी पाणी घालून मंद आचेवर 15 – 20 मिनिटे झाकण ठेऊन शिजवा.
कैरीच्या फोडी मऊ शिजल्या की त्यात गूळ आणि तिखट, मीठ घाला.
1/2 वाटी पाणी घाला.
व्यवस्थित ढवळून घ्या.
आता परत 7 – 8 मिनिटे हे मिश्रण चांगले रटरटू द्या.
झाकण ठेवण्याची गरज नाही.
सात – आठ मिनिटांनी गॅस बंद करा.
मेथांबा तयार आहे.

मेथांबा आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा.
मी वर लिहिल्याप्रमाणे कैरीची चव बघून गूळ घाला.
तिखटही चवीप्रमाणे कमी जास्त करता येईल.
एक दोन दिवस मेथांबा बाहेर टिकतो.
त्यानंतर उरलाच तर फ्रिजमध्ये ठेवा.

पण फ्रिजमध्ये ठेवायला मेथांबा उरतच नाही.🙂

Methamba Recipe in English – Spicy – Sweet – Sour Raw Mango Pickle

मेथांबा रेसिपी मराठी, कैरीचे लोणचे, गोड लोणचे, लोणचे रेसिपीज, methamba recipe marathi, methamba recipe english, kairi ka achar, achar recipes, आंब्याचे पदार्थ, कैरीचे पदार्थ

Ingredients –

1 large raw mango
( approx. 2 cups of chopped pieces)
2 tbsp jaggery (depending on the sour taste of the raw mango or according to your taste)
1 tbsp oil
1 tsp mustard seeds
2 tsp fenugreek seeds
1 tsp red chili powder
Asafoetida
Turmeric powder
Salt
Directions –
Peel the raw mango and cut into small cubes.
Heat oil and add mustard seeds.
When the mustard is spluttered, add asafoetida and fenugreek.
Saute fenugreek seeds quickly without burning.
Once fenugreek is well fried, add turmeric powder and choppped raw mango.
Add a cup of water and cook over low heat for 15-20 minutes with lid on.
When the raw mango cubes are soft, add jaggery, chilli powder and salt.
Add 1/2 cup of water.
Stir well.
Let it simmer for another 7-8 minutes.
No need to keep the lid on.
Turn off the heat after seven to eight minutes.
Methamba is ready.

2 thoughts on “आंबट – गोड – तिखट मेथांबा

Leave a Reply