प्रसादाचा गोड शिरा – रव्याचा गोड शिरा

प्रसादाचा गोड शिरा – रव्याचा गोड शिरा

Ravyacha Sheera Recipe – Sooji Ka Halwa – Suji Halwa

प्रसादाचा शिरा रेसिपी, रव्याचा गोड शिरा, गोडाचा शिरा रेसिपी, सूजी का हलवा रेसिपी, सूजी हलवा रेसिपी, हलवा रेसिपी, शिरा रेसिपी, sooji ka halwa recipe, suji halwa, halwa recipe, sheera recipe marathi
 
श्रावण महिना आला की एका पाठोपाठ एक सणांची सुरूवात होते. श्रावणात, गणपतीत बर्‍याच जणांकडे सत्यनारायणाची पूजा करतात. एरवीही सणासुदिला नैवेद्यासाठी किंवा गोड म्हणून बाकी काही करायला वेळ नसला तर पटकन होणारा गोड शिरा हमखास केला जातो. रव्याचा गोड शिरा करायला सोपा असला तरी त्याचेही खास तंत्र असते. कधी कधी घाई झाली तर काहीतरी तंत्र बिघडते. शिरा मऊ, मोकळा न होता, गोळा होणे, गुठळ्या होणे, चिकट होणे असे प्रकार झाले की मूड जातो. रव्याचा गोड शिरा करताना विशेषत:सत्यनारायणाचा प्रसाद करताना एक प्रमाण ठरलेले असते. त्या प्रमाणात सगळे साहित्य घेतले की रव्याचा शिरा छान मनासारखा होतो.

साहित्य –
1 वाटी जाड रवा
1 वाटी तूप
1 केळं
1 वाटी साखर
3 वाट्या दूध
2 टेस्पून किसमिस किंवा मनुका
1 टेस्पून बदामाचे काप
1 टेस्पून काजूचे तुकडे
1 टीस्पून वेलची पावडर

 
प्रसादाचा गोड शिरा, रव्याचा गोड शिरा, शिरा रेसिपी, गोडाचा शिरा, सूजी का हलवा, हलवा रेसिपी, sooji ka halwa, ravyacha sheera recipe, halwa recipe, sheera recipe, suji halwa
प्रसादाचा गोड शिरा, रव्याचा गोड शिरा, शिरा रेसिपी, सूजी का हलवा, हलवा रेसिपी, सूजी हलवा, ravyacha sheera recipe marathi, sooji ka halwa, suji halwa, halwa recipe, sheera recipe

कृती –
कढईत तूप गरम करा.
तूप पातळ झाले की त्यात रवा घाला.
रवा भाजताना एकीकडे दूध गरम करायला ठेवा.
रव्यात घालताना दूध अगदी उकळते असायला हवे.
मंद आचेवर रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजा.
रवा भाजून होत आला की त्यात ड्रायफ्रूटस् आणि केळं बारीक कुस्करून घाला.
तूप जास्त असल्यामूळे सुकामेवा आधी तुपात वेगळा परतून घेतला नाही तरी चालतो.
सुकामेवा नीट परतला गेला आणि केळं रव्यात छान एकजीव झालं की त्यात उकळते दूध घाला म्हणजे रवा छान फुलून येईल.
आता झाकण ठेऊन एक वाफ घ्या.
एक वाफ आली की शिर्‍यात साखर घाला.
परत नीट ढवळून एक वाफ घ्या.
गॅस बंद करून वेलची पूड घालून मिक्स करा.

शिर्‍यासाठी जाड किंवा बारीक कोणताही रवा घेता येतो.
फक्त त्याप्रमाणे शिर्‍याच्या टेक्सश्र्चरमध्ये फरक पडेल.
वर दिलेले तुपाचे प्रमाण जास्त वाटले तरी प्रसादाचा शिरा करताना रवा,  साखर, तूप सगळं समं प्रमाणातच घेतात.
पण आपल्या चवीप्रमाणे कमी तुपात केला तरी चालेल.
शिरा करताना रवा कोणत्याही प्रकारचा घेतला किंवा तूप कमी घेतले तरी रवा व्यवस्थित, खरपूस भाजणे सगळ्यात महत्वाचे आहे.
रवा कमी भाजला तर शिरा मोकळा न होता गोळा होतो.
तसेच दूध घालतानाही गार घालू नका.
त्यानेही फरक पडतो.
रवा जाड किंवा बारीक कसा आहे, शिवाय किती भाजला गेलाय त्याप्रमाणे दूध थोडं कमी जास्त लागू शकेल.
पूर्ण दूधाऐवजी दूध पाणी अर्धे अर्धे घेऊन किंवा फक्त पाण्याचाही शिरा करतात.
तुपाऐवजी रिफाइंड किंवा कोणत्याही न्यूट्रल चवीच्या तेलातही शिरा करतात.
केळं घालताना वरून नुसतं घातलं तर ते काळं पडतं.
पण रव्याबरोबर किंवा तूप गरम झाल्यावर केळं परतून घेऊन नंतरही शिर्‍यात मिक्स करू शकतो.
त्यामुळे केळं दिसून न येता केळ्याचा मस्त असा स्वाद शिर्‍याला लागतो.

 
शिर्‍याचे हेही प्रकार बघा –
 

Sooji Ka Halwa Recipe in English

प्रसादाचा गोड शिरा, रव्याचा गोड शिरा, शिरा रेसिपी, सूजी का हलवा, सूजी हलवा, हलवा रेसिपी, sooji ka halwa, suji halwa, ravyacha sheera recipe marathi, sheera recipe
Ingredients –
1 cup coarse semolina
1 cup ghee
1 medium size banana
1 cup sugar
3 cups milk
2 tbsp raisins
1 tbsp almond slices
1 tbsp chopped cashews
1 tsp cardamom powder
Directions –
Heat ghee in a pan.
When the ghee is melted, add semolina.
Heat the milk on one side while roasting the semolina.
The milk should be boiling hot when added to the semolina.
Roast the semolina over low heat till it turns golden brown.
Once the semolina is roasted, add finely chopped nuts and mashed banana.
As we are using lots of ghee, we don’t need to fry nuts seperately.
Once the nuts are well fried and the bananas are well blended into the semolina, add boiling milk to it so that the semolina wull puffed up nicely.
Now cover and cook for 4 – 5 minutes.
After 4 – 5 minutes add sugar and again simmer for 5 minutes over low heat.
Turn off the heat, add cardamom powder and mix well.
Coarse or fine any type of semolina can be used for making sheera or halwa.
Only then there will be difference in the texture.
Although the amount of ghee given above seems to be a lot, but ghee, semolina, and sugar are taken in equal proportions while making halwa for special occasions or bhog(offerings).
But you can reduced the amount of ghee according to your taste.
Regardless of the type of semolina taken or the amount of ghee consumed, it is most important to  roast the semolina properly.
If semolina is roasted less, it will not puff up.
Also, do not add cold milk.
The amount of milk can be adjusted according to the desired consistency of the sheera and its also depends on the quality and roasting of semolina.
Instead of using the milk, 50% of milk and 50% of water or only water can be used.
We can make sheera in refined or any neutral flavoured oil instead of ghee.
Instead of adding banana directly to the halwa it is better to fry it in the ghee so it won’t get brown.
It is totally optional to use banana while making halwa.
But in Maharashtra it is the traditional method to use banana when we make sheera or halwa for the Bhog or offerings.

2 thoughts on “प्रसादाचा गोड शिरा – रव्याचा गोड शिरा

Leave a Reply