प्रसादासाठी 10 मिनिटांत न शिजवता 6 गोड पदार्थ

6 Types Of Instant/No Cook Mithai Recipes in 10 Minutes

मिठाई रेसिपीज मराठी, नो कुक मिठाई रेसिपीज मराठी, झटपट गोड पदार्थ, प्रसाद रेसिपीज मराठी, मोदक रेसिपीज मराठी, दिवाळीसाठी मिठाई रेसिपी, पेढा रेसिपी, बर्फी रेसिपी, लाडू रेसिपी, no cook mithai recipe, mithai recipe marathi, instant mithai recipe marathi, instant prasad recipes, diwali sweets, easy indian sweets recipe,
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या काळात, म्हणजेच चातुर्मासात अनेक सण आणि व्रतंवैकल्यांमुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. एकादशी मग श्रावण महिना, गणपती, नवरात्र, दसरा ते पार दिवाळीपर्यंत रोजचा दिवस विशेष असतो. सण साजरे करण्याचा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही. एखादी व्यक्ती धार्मिक असली किंवा नसली तरी ‘साजरे करणे किंवा सेलिब्रेशन हे कशाच्याच आड येत नाही. सण किंवा उत्सव साजरे करताना त्याचा मूळ उद्देश बघितला तर अनेक गोष्टी लक्षात येतात. सणांच्या निमित्ताने जेव्हा आपण घराची स्वच्छता, घर आवरणे, सजवणे, खरेदी, वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणे, खाणे, खिलवणे हे सगळं करतो. तेव्हा काय होतं? नक्कीच छान, प्रसन्न वाटतं. कोणी सांगतय म्हणून, पद्धत आहे म्हणून किंवा सगळे करतात म्हणून करण्यापेक्षा माझ्या मते प्रत्येकाने स्वत:ला जे आवडतं किंवा ज्यातून आनंद मिळतो ते आणि तेवढच करावं. मग खर्‍या अर्थाने आपण ते enjoy करू शकतो.

जर तुम्हाला सणासुदीच्या दिवसांमध्ये शाॅपिंग करायला, घर सजवायला आवडत असेल तर बाकी सगळं एकीकडे करून त्यासाठी वेळ द्या. स्वत: छान तयार व्हायला, नट्टापट्टा करायला आवडत असेल तर त्यासाठी नक्की वेळ काढा. मस्त फोटो काढून बिंधास्त सोशल मिडिआवर शेअर करा. काही बिघडत नाही. यातून मिळणारा आनंद हा जास्त महत्वाचा.

सेम असंच स्वयंपाकाच्या बाबतीत. मी जर दुपारी किंवा संध्याकाळी ‘खादाडी’साठी एखादी रेसिपी केली आणि दमले असले तर किंवा नंतर ब्लाॅग लिहायला, पोस्ट करायला वेळ हवा असेल तर परत रात्री सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करायचा मला कंटाळा येतो. मग वरणभात, खिचडी, पिझ्झा बर्गर आॅर्डर करणे किंवा मनिष, मनालीपैकी ज्याला जसा वेळ असेल किंवा भुर्जी, ब्रेड आॅम्लेट, नूडल्स असं जे खायची इच्छा किंवा मूड असेल त्याप्रमाणे बेत ठरतो. अगदी जसा मूड असेल तसं आयत्या वेळेस काहीही ठरतं. हे जस्ट मी एक उदाहरण दिलं. कित्येकदा मस्त आॅर्डर केलेला पिझ्झा किंवा बर्गर खात खात मी एखादी पोस्ट लिहित असते. (नाही, आत्ता यापैकी काहीच करंत नाहीये🙂).थोडक्यात सांगायचे झाल्यास माझा फूड ब्लाॅग आहे म्हणजे मी संपूर्ण वेळ स्वयंपाक घरातच असते का? तर मुळीच नाही.

सण, उत्सव, व्रत – वैकल्ये करताना नैवेद्य, सोवळ्याचा स्वयंपाक हे सगळं झेपेल इतकच केलं तरच त्यातून आनंद मिळतो. भारतात आपल्याकडे बरीच सोय तरी असते. स्वत:ला काही करणे शक्य नसल्यास अनेक पर्याय असतात. विकत आणणे, आॅर्डर करणे किंवा घरी आचारी बोलावून करून घेणे हे सगळं खूपच सोप्प आहे.

पण याचीच दुसरी बाजू म्हणजे कधी कधी काही न करता आपल्यालाच चैन पडत नाही किंवा परदेशात असाल तर घरी करण्याशिवाय आॅप्शनच नसते. गणपतीत मोदकांची आॅर्डर दिली तरी आरतीला झटपट होणारा काहीतरी प्रसाद करायची इच्छा होतेच. दिवाळीत फराळ बाहेरून आणला तरी बाकी काही नाही पण फक्त लक्ष्मीपुजनाच्या नैवेद्यापुरतच काहीतरी केलं जातं. यामागे ‘मी केलं’ किंवा ‘घरी केलं’ यातला आनंद किंवा समाधान हा काही जणांसाठी महत्वाचा असतो.

आजची ही पोस्ट त्यासाठीच आहे. आज मी जे 6 गोड पदार्थ शेअर करणार आहे ते अगदीच पटकन होणारे आहेत. या पदार्थांच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सगळे पदार्थ न शिजवता, गॅस न वापरता करता येण्यासारखे आहेत. नैवेद्यासाठी, प्रसादासाठी किंवा नुसतेच स्वीटस् म्हणून तुम्ही हे करू शकता.

प्रत्येक रेसिपी शेअर करताना त्या त्या पदार्थाचे साहित्य मी देणारच आहे. त्याशिवाय सोयीसाठी मी ही जनरल लिस्ट देते आहे. त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. या यादीप्रमाणे तुम्ही ग्रोसरी करतानाच काही वस्तू आणून ठेवल्या तर अनेक गोड पदार्थ 10 – 15 मिनिटांत अगदी आयत्या वेळेस झटपट करू शकता. या यादीतल्या बेसिक, नेहमी लागणार्‍या गोष्टी आपण ग्रोसरी करताना आणतोच. त्या घरोघरी असतातच. पण काही काही वस्तू जसे की, कंडेंस्ड मिल्क, मिल्क पावडर, गुलकंद, रूह अब्जा अशा सारख्या गोष्टी सगळ्यांना नेहमी लागतातच असं नाही. पण मग या सणासुदीच्या दिवसांत आठवणीने आपण या काही वस्तू आणून ठेवल्या तर काम खूप सोपे होते. एकदा तुम्ही हे बेसिक साहित्य आणलं की मग प्रत्येक वेळेस काही करायची इच्छा झाली तर सगळं आहे का हे बघण्याची कटकटच राहात नाही.

दूध (परदेशात हे रोज सकाळी दारावर आयतं मिळण्याची चैन नसते. भाजी किंवा इतर किराणाप्रमाणेच लागेल तसे जाऊन आणावे लागते.)
साजूक तूप (रेडिमेड तूप किंवा घरी कढवायचे असेल तर लोणी/अनसाॅल्टेड बटर)
मिल्क पावडर
कंडेंस्ड मिल्क स्वीट (घरी करा किंवा विकत आणा)
डेसिकेटेड कोकोनट
चिवड्याच डाळं
शेंगदाणे भाजलेले
सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते, केशर आणि किसमिस)
खजूर
वेलची पावडर
व्हॅनिला इसेन्स
गुलाब/केवडा वाॅटर
रूह अब्जा/गुलकंद
1 – 2 फूड कलर्स
चांदीचा वर्ख
ही झाली सगळी तयारी.

आता रेसिपीज बघू या. यातले बरेचसे प्रकार उपासालाही चालतील असे आहेत. शिवाय बेसिक मिश्रणातून तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन तुम्ही लाडू, वड्या, पेढे, मोदक, रोल्स असे अनेक प्रकार करू शकता. सुकामेवा किंवा वेगवेगळे इसेन्स आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. सुकामेवा घालताही डायरेक्ट मिक्स करता येईल किंवा बारीक करून सारणासारखा आत भरू शकतो. आपली कल्पनाशक्ती वापरून खूप वेगवेगळे प्रयोग करता येतील. काही आयडिआज मी शेअर केल्या आहेत त्या वाचून तुम्हाला नीट कल्पना येईल.

1. काजू कतली/ बाॅल्स किंवा लाडू/ पेढे/ मोदक/ रोल्स 

इंस्टंट काजू कतली, सोपी काजू कतली रेसिपी मराठी, इंस्टंट मिठाई रेसिपी मराठी, दिवाळी फराळ, दिवाळी मिठाई मराठी रेसिपी, नो कुक मिठाई रेसिपी मराठी, इंस्टंट बर्फी रेसिपी, काजू मोदक रेसिपी मराठी, प्रसाद रेसिपी मराठी, गणेश चतुर्थी प्रसाद रेसिपी, instant no cook kaju katli recipe matathi, kaju katli recipe marathi, kaju modak recipe, homemade diwali mithai recipes, instant diwali sweets, modak recipes, ganesh chaturthi special mithai

साहित्य –
1 कप काजू
1/4 कप मिल्क पावडर
1/4 कप पिठीसाखर
1 टीस्पून गुलाबपाणी
1 – 2 टेस्पून दूध
1/2 टीस्पून तूप
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)

कृती –
मिक्सरमध्ये पल्स करत काजूची अगदी बारीक पावडर करा.
थांबून थांबून सावकाश पल्स करा म्हणजे तेल सुटणार नाही.
वाटल्यास तयार काजूची पावडर चाळून घ्या.
काजूची पूड, मिल्क पावडर आणि पिठीसाखर व्यवस्थित मिक्स करा.
आता यात गुलाब पाणी घालून एकजीव करा.
यात लागेल तसं थंड दूध घाला.
दूध घालून मऊ पण नीट वड्या पडतील असा गोळा करा.
हातावर किंचित तूप घेऊन ते काजूच्या भिजवलेल्या गोळ्याला सगळीकडे चोळा.
पोळपाटावर बटर पेपर ठेऊन हा गोळा लाटून घ्या.
हवा असेल तर वरून चांदीचा वर्ख लावा.
शंकरपाळ्याच्या आकारात काजू कतली कापा.

गुलाबपाण्याऐवजी स्वादासाठी केवडा वाॅटर, वेलची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स यापैकी काहीही घालता येईल.
काजू कतलीऐवजी काजू बाॅल्स, काजू पेढे, मोदकाचे जे लहान साचे मिळतात त्यात भरून काजू मोदक किंवा वळून काजू रोल्स असे अनेक प्रकार करू शकतो.

 

2. बदाम कतली/ बाॅल्स किंवा लाडू/ पेढे/ मोदक/ रोल्स 

काजू कतली प्रमाणेच बदाम कतली करता येईल.
फक्त बदाम कतली करताना बदाम आधी पाण्यात भिजत घालून सालं काढून टाका आणि बदाम कोरडे करा.
बाकी सर्व साहित्य आणि कृती काजू कतली प्रमाणेच.

3. स्वीट रोल्स (चिवड्याचं डाळं वापरून)/ बर्फी किंवा वडी/ पेढे/ लाडू/ मोदक 

इंस्टंट मिठाई रेसिपी मराठी, नो कुक मिठाई रेसिपी, दिवाळी मिठाई रेसिपी मराठी, मोदक रेसिपीज मराठी, झटपट होणारी सोपी मोदक रेसिपी, बेसनाची मिठाई, instant mithai recipes marathi, easy no cook mithai recipes, prasad recipes marathi, insant modak recipes, easy modak recipes marathi, easy diwali sweets, instant diwali mithai, दिवाळी फराळ रेसिपी

साहित्य –
1 कप डाळं
1/2 कप तूप
1/2 कप पिठीसाखर
1 – 2 टेस्पून मिल्क पावडर
1/2 टीस्पून वेलची पावडर

कृती –
डाळं मिक्सरमध्ये फिरवून पीठ करा.
खाताना जसं टेक्स्चर हवं असेल त्याप्रमाणे अगदी बारीक पीठ किंवा किंचित रवाळ चालेल.
या पीठात पिठीसाखर, मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
लागेल तसे पातळ तूप घालून गोळा करा.
मग वळून रोल तयार करा आणि मांडून ठेवा.

चवीसाठी यात सुकामेवा पातळ काप करून किंवा भरड चूरा करून घातला तर दिसायलाही छान दिसेल.
रोल्सऐवजी वड्या, लाडू, पेढे किंवा मोदक असा कोणताही आवडीचा आकार देता येईल.

4. शुगर फ्री नटी डिलाईट 

शुगर फ्री मिठाई रेसिपी मराठी, इंस्टंट मिठाई रेसिपी मराठी, नो कुक मिठाई रेसिपी मराठी, दिवाळीसाठी होममेड शुगर फ्री मिठाई रेसिपी, शुगर फ्री मोदक रेसिपी मराठी, दिवाळी फराळ, instant mithai recipe, easy mithai recipes marathi, diwali sweets recipes marathi, homemade sugar free mithai recipe, sugar free modak recipes
 

साहित्य –

1/2 कप काजू
1/2 कप बदाम
1/2 कप पिस्ते
200 ग्रॅम खजूर
तूप
वरून लावायला खसखस किंवा पिस्त्याचे काप किंवा चांदीचा वर्ख

कृती –
काजू, बदाम आणि पिस्त्याची रवाळ पावडर करा.

खजूरात बिया असतील तर त्या काढून टाका.
खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
छान मऊ असेल तर हाताने कुस्करला तरी चालेल.
ड्रायफ्रुटसची पावडर आणि वाटलेला खजूर व्यवस्थित मिक्स करा.
हाताला तूप लाऊन हा गोळा जाडसर थापा.
वरून सजावटीसाठी खसखस, पिस्त्याचे काप किंवा चांदीचा वर्ख लावा.
कुकी कटर किंवा छोटे झाकण वापरून आकार द्या.

सुकामेवा आवडीप्रमाणे कोणताही घ्या.
सगळी मिळून साधारण 1 ते 1 1/2 कप पावडर होईल याप्रमाणे घ्या.
काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड, भाजलेले शेंगदाणे सालं काढून यापैकी जो असेल तो घ्या.
मीठ न घातलेला रोस्टेड सुकामेवाही घेऊ शकता.

बाजारात विकत मिळतो.
याचेही लाडू, पेढे, मोदक किंवा रोल करता येईल.

5. शेंगदाण्याचे लाडू/ पेढे/ मोदक/ वड्या/ रोल्स

शेंगदाण्याचे लाडू मराठी रेसिपी, उपवासाचे पदार्थ मराठी रेसिपी, इंस्टंट नो कुक मिठाई रेसिपी, सोपी लाडू रेसिपी, पाक न करता लाडू रेसिपी, इंस्टंट मोदक रेसिपी, इंस्टंट पेढा रेसिपी, peanut laddu recipe, vrat ki mithai, moongfali laddu recipe, instant homemade modak recipe, shengdanyache ladoo recipe marathi, instant no cook mithai

साहित्य –
1 कप भाजलेले शेंगदाणे
3/4 ते 1 कप चिरलेला गूळ
वेलची पावडर

कृती –
शेंगदाण्याचे बारीक कूट करा.
त्यात गूळ आणि वेलची पावडर घाला.
व्यवस्थित एकजीव करून लहान लहान लाडू करा.
बदल म्हणून लाडू ऐवजी पेढे, मोदक, थापून वड्या किंवा रोल्स असा कोणताही प्रकार करता येईल.

शेंगदाण्याचे लाडू हा आपला एक पारंपारिक पदार्थ.
न शिजवता करता येणार्‍या पदार्थांपैकी आद्य प्रकार म्हणता येईल असा हा प्रकार आहे.
उपास असेल तर कधीही पटकन गोड करण्यासाठी एकदम सोपा आणि तितकाच खमंग लागणारा प्रकार म्हणजे हे शेंगदाण्याचे लाडू.
पूर्ण गुळाऐवजी अर्धा गूळ आणि अर्धा खजूर घेतला तरी चव पण छान लागते आणि लाडू पौष्टिकही होतात.

6. डबलडेकर बर्फी

खोबर्‍याची इंस्टंट बर्फी रेसिपी, बर्फी रेसिपी मराठी, नारळाची वडी कशी करायची, खोबर्‍याची वडी रेसिपी मराठी, इंस्टंट बर्फी रेसिपी मराठी, झटपट होणारी गोड वडी रेसिपी, उपवासाचे पदार्थ, उपवासासाठी गोड पदार्थ, nariyal ki barfi recipe, instant barfi recipe marathi, easy barfi recipe marathi, no cook mithai recipe, vrat recipes, instant diwali sweets recipe, diwali sweets recipe marathi, नारळी पौर्णिमेसाठी नारळाचे पदार्थ

साहित्य –
2 कप डेसिकेटेड कोकोनट
1/2 कप कंडेंस्ड मिल्क
1 टेस्पून रूह अब्जा किंवा कोणतेही रोझ सिरप
1 टी स्पून गुलाबपाणी
रेड फूड कलर

कृती –
डेसिकेटेड खोबर्‍यात कंडेंस्ड मिल्क आणि गुलाब पाणी घालून मिक्स करा.
कंडेंस्ड मिल्क घालताना एकदम सगळे न घालता थोडे थोडे घाला.
वड्या थापता येतील असा गोळा करा.
याचे सारखे दोन भाग करा.
एक भाग पांढराच ठेवा.
दुसर्‍या भागात रोझ सिरप आणि हवा असल्यास लाल रंग घाला.
थापताना ट्रेमध्ये आधी पांढरा भाग थापा.
हाताने दाबून घट्ट करा.
या पांढर्‍या भागावर गुलाबी रंगाचा भाग थापा.
हाताने सारखा करा.
5 – 10 मिनिटे ट्रे न झाकता तसाच ठेवा, म्हणजे वड्या नीट सेट होतात.
सेट झाल्या की वड्या कापा.

 

6 Types of Instant/ No Cook Mithai or Prasad Recipes

1. How to Make Instant Kaju Katli/ Kaju Balls or Laddu/ Kaju Peda/ kaju Rolls

Ingredients –
1 cup cashews
1/4 cup milk powder
1/4 cup powdered sugar
1 tsp rose water
1 – 2 tbsp milk
1/2 tsp ghee
Edible Silver leaf (optional)
Directions –
Pulse in a blender and grind the cashews very finely.
Pulse gently and make sure not to realese oil from the cashews.
Sift the prepared cashew powder if desired.
Mix cashew powder, milk powder and powdered sugar well.
Now add rose water and mix well.
Add cold milk as required.
Add milk and make a soft but smooth dough.
Take a little ghee in your hand and rub it all over the prepared cashew dough.
Place the butter paper on a rolling pan and roll it up the cashew dough.
If desired, apply silver leaf on top.
Cut Kaju Katli into dimond shape.
Instead of rose water, you can add Kevada water, cardamom powder or vanilla essence for flavor.
Instead of making Kaju Katli, you can make Kaju Balls or Laddu, Kaju Modak, Kaju Peda or Kaju/ cashew rolls.

2. Badam or Almond Katli/ Balls or Laddu / Peda / Modak / Rolls

You can make Badam Katli using the same method of making Kaju Katli.
While making Badam Katli, first soak the almonds in water, remove the skins and dry the almonds.
All other ingredients and recipe is the same as Kaju Katli.

3. Sweet Rolls (Using Roasted Gram or Daria)/ Barfi/ Balls or Laddu/ Peda or Modak

Ingredients –
1 cup Roasted Gram or Daria
1/2 cup ghee
1/2 cup powdered sugar
1 – 2 tbsp milk powder
1/2 tsp cardamom powder
Directions –
Grind the roasted gram in a blender.
It will be finely ground or slightly granular as desired.
Add powdered sugar, milk powder and cardamom powder and mix well.
Add melted ghee as required.
Combine everything very well and make rolls from the mixture.
You can add dry fruits like cashews, almonds, pistachios or any other nuts of your choice.
Instead of rolls, any favorite shape can be given as Barfi, Laddu, Pede or Modak.

4. Sugar Free Nutty Delight

Ingredients –
1/2 cup cashews
1/2 cup almonds
1/2 cup pistachios
200 grams of dates
Ghee
Poppy Seeds or pistachio slices or edible silver foil to garnish
Directions –
Grind cashews, almonds and pistachios and make a coarse powder.
If there are seeds in the date, remove them.
Grind the dates in a blender.
If the dates are soft, it can be crushed by hand.
Mix dry fruit powder and crushed dates properly.
Apply ghee on your hands and spread this mixture evenly on a butter paper.
Garnish with poppy seeds, pistachio slices or silver foil.
Cut in a desire shape using a cookie cutter or small lid.
Take any of the nut you like to make this mithai. Take 1 or 1 1/2 cup of powder in total.
You can use store brought unsalted roasted dry fruits or nuts.
You can make laddu, peda, modak or rolls as per your choice.

5. Peanuts Laddu/Peda/Barfi/Modak/ Rolls

Ingredients –
1 cup roasted peanuts
3/4 to 1 cup chopped jaggery
Cardamom powder
Directions –
Finely grind the peanuts in a blender and make a fine or little coarse powder.
You can grind the peanuts with or without skin.
Add jaggery and cardamom powder.
Mix well and make small laddu or balls.
Instead of laddu, you can make peda, modak, barfi or rolls.
Peanut laddu is one of our traditional dishes.
This peanut laddu is an easy and equally delicious recipe for vrat or fasting.
Instead of using only jaggery you can use jaggery and dates in equal quanity.

6. Double Decker Barfi

Ingredients –
2 cups desiccated coconut
1/2 cup condensed milk
1 tbsp Rooh Afaza or any rose syrup
1 tsp rose water
Red food color
Directions –
Add condensed milk and rose water to desiccated coconut and mix.
When adding condensed milk, add little by little without adding everything at once.
Make a dough of barfi consistency.
Divide this into two parts.
Keep one part white.
In the second part, add rose syrup and red food colour.
In a tray, set the white part first.
Spread evenly by pressing with your palm.
Now spread a pink colour dough on this white part of barfi.
Again press gently.
Leave the tray uncovered for 5-10 minutes, so that barfi can set properly.
Cut Double Decker Barfi into any desired shape when set.

2 thoughts on “प्रसादासाठी 10 मिनिटांत न शिजवता 6 गोड पदार्थ

Leave a Reply