चमचमीत मटारभात – मटारभात कसा करायचा?

चमचमीत मटारभात – मटारभात कसा करायचा?

Maharashtrian Style Matar Bhat – Easy and Quick Green Peas Pulao Recipe – No Onion No Garlic Maharashtrian Matar Bhat 

खिचडी किंवा पुलावपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर हा मटारभात बेस्ट आॅप्शन आहे. अत्यंत सात्विक चवीचा लागतो. कांदा लसूण नाही की खूप भाज्या चिरणं नाही. एकदम झटपट होतो.

साहित्य –

1 कप तांदूळ
1 कप मटार (ताजे किंवा फ्रोजन)
1 टेस्पून गोडा किंवा गरम मसाला
3 टेस्पून तेल
3 – 4 सुक्या लाल मिरच्या
मोहरी
हिंग
हळद
1 टीस्पून धणेपूड
कढीपत्ता
चवीप्रमाणे मीठ

कृती –

तांदूळ धुऊन निथळत ठेवा.
तेल गरम करून मोहरी, हिंग घालून फोडणी करा.
फोडणीत कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या घाला.
परतून हळद घाला.
त्यावर तांदूळ धणेपूड,आणि गोडा/गरम मसाला घालून खूप  परता.
तांदूळ नीट परतल्यामुळे भात छान मोकळा होतो.
तांदूळ परतले की फ्रोजन मटार धुऊन घाला.
आता मटार घालून व्यवस्थित परतून घ्या.
दोन कप गरम पाणी आणि मीठ घालून ढवळून झाकण ठेवा.
मंद आचेवर भात शिजवा.
पाणी आटले की मटारभात छान फुलून आलेला दिसेल.
गॅस बंद करून भात पाचेक मिनिटं तसाच झाकून ठेवा.
वरून खोबरं, कोथिंबीर घाला.

मटारभातात काजू घालून पण भात खूप छान लागतो.
ताजे मटार असतील तर तांदूळ घालायच्या आधी फोडणीत किंवा वेगळे वाफवून घ्या.
खिचडी, पुलाव, मसाले भात असे पदार्थ जेव्हा आपण डायरेक्ट पातेल्यात करतो तेव्हा पाणी आटलंय का बघण्यासाठी ही टिप वापरा.
भात होत आलाय असं वाटलं की ओट्यावर थोडसं पाणी ओता किंवा झाकण काढून वाफेचं पाणी पडू द्यायचं.
झाकण काढून कढई त्या पाण्यात ठेवा जर चर्रर्र असा आवाज आला तर भात झालाय असे समजायचे नाहीतर थोडावेळ होऊ द्या.

या ब्लाॅगवरचे भाताचे इतर चमचमीत प्रकारही तुम्हाला नक्कीच आवडतील.
भात, पुलाव प्रकार

Maharashrian Style Matar Bhat Recipe – Quick and Easy No Onion No Garlic Green Peas Pulao Recipe 

Ingredients – 
1 cup rice
1 cup peas (fresh or frozen)
1 tbsp sweet or garam masala
3 tbsp oil
3 – 4 dried red chillies
Mustard seeds
Asafoetida
Turmeric
1 tsp coriander powder
Curry leaves
Salt to taste

Directions –

Wash and drain the rice.
Heat oil, add mustard seeds and asafoetida.
Add curry leaves and dried chillies.
Add turmeric powder.
Add rice, coriander powder and Goda / garam masala and saute well.
It is very important to saute rice grains very well for non sticky and fluffy pulao.
When you see the rice grains are fried well, wash the frozen peas.
Now add peas and saute properly.
Add two cups of hot water and salt, stir and cover.
Cook the rice over low heat.
When the water absorbes, you can see the pulao has fluff up nicely.
Turn off the heat and cover the rice for five minutes.
Garnish with grated coconut and cilantro and serve hot.

2 thoughts on “चमचमीत मटारभात – मटारभात कसा करायचा?

Leave a Reply