3 प्रकारची एकदम झटपट होणारी बासुंदी/रबडी रेसिपी

3 प्रकारची एकदम झटपट होणारी बासुंदी/रबडी रेसिपी – तासन तास दूध न आटवता

3 Ways Instant and Quick Rabdi/Basundi Recipe

इंस्टंट रबडी रेसिपी, इंस्टंट बासुंदी रेसिपी, रबडी रेसिपी मराठी, बासुंदी रेसिपी मराठी, ब्रेड रबडी, मिल्कपावडर रबडी, मिल्कमेड रबडी, instant rabdi recipe, instant basundi recipe, rabdi recipe marathi, basundi recipe, rabdi with bread, rabdi with milk powder, rabdi with milkmaid
महाराष्ट्र आणि गुजरातमधली बासुंदी मध्यप्रदेशपासून वर उत्तरेकडे गेली की तिची रबडी होते. बासुंदी आणि रबडी – तशी तर एकाच पदार्थाची दोन नावे आहेत. पण ढोबळ फरक करायचाच झाला तर बासुंदी ही थोडी पातळ आणि रबडी म्हणजे घट्ट, चमच्याने खाता येईल अशी. दुधाचा खवा होण्याआधीची स्टेज म्हणजे रबडी. पण नक्की किती दाट हे सुद्धा वैयक्तिक आवड कशी आहे त्यावर अवलंबून आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास माझे सासर मध्यप्रदेशातले असल्यामुळे सासरी बासुंदी केली तरी रबडी केली, रबडी खाल्ली असेच म्हणतात. याउलट मी जेव्हा बासुंदी करते तेव्हा ती रबडीसारखी घट्ट असते. कोजागिरीचे मसाला दूधसुद्धा घरी सगळ्यांना आवडतं म्हणून मी थोडसं जास्त आटवते.
पारंपारिक पद्धतीने दूध आटवून बासुंदी किंवा रबडी करणे म्हणजे एकदम वेळखाऊ काम. शिवाय आटवण्यासाठी दूधही जास्त लागते. मंद गॅसवर रबडी आटवताना सारखं बघावं लागत नाही पण वेळ आणि गॅस भरपूर लागतोच. शिवाय कितीही काळजी घेतली, म्हणजे तळाशी बशी ठेवणे, चमचा ठेवणे असे प्रकार केले तरी कधीतरी बासुंदी खाली लागतेचं की सगळे मुसळ केरात. मग तो जळका वास जाता जात नाही.

या सगळ्यावर बेस्ट उपाय म्हणजे इंस्टंट बासुंदी किंवा रबडी. कमी कष्टात झटपट होणारी रबडी आपण अनेक प्रकारे करू शकतो. आज आपण ज्या 3 वस्तू वापरून रबडी करणार आहोत त्या अगदी सहज सगळीकडे मिळतात. देशात, विदेशात कुठेही. कंडेंस्ड मिल्क, मिल्क पावडर आणि ब्रेड वापरून खूप कमी वेळेत छान घट्ट, क्रिमी बासुंदी तुम्ही करू शकता. शिवाय या पद्धतीने केलेली बासुंदी किंवा रबडी गुळगुळीत एकसारखी होते. बर्‍याच जणांना रबडी खाताना साय तोंडात आलेली आवडत नाही. रबडीची खरी मजा त्यातच आहे.🙂 हाय कंबख्त तूने पी ही नहीं! असो! आपापली आवड. म्हणूनच मग कंडेंस्ड मिल्क, मिल्क पावडर किंवा ब्रेड यापैकी तुमच्या आवडीप्रमाणे जे हाताशी असेल ते घालून पटकन रबडी करा. ही झटपट केलेली रबडी आवडंत असेल तर गरम ही खाऊ शकता. पण तेच रात्री करून फ्रिजमध्ये ठेवली तर दुसर्‍या दिवशी जास्त चांगली लागते. मस्त घट्ट होते आणि मुरल्यावर जी चव वाढते ती म्हणजे अहाहा! तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारे रबडी केलीत आणि आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.👍

दुधाचे काही गोड पदार्थ –
शेवयांची शाही खीर
रोज फिरणी

Video Recipe of Bread Rabdi –

 

1. ब्रेडची रबडी –

 

साहित्य –
1 ली दूध (शक्यतो फुल क्रिम)
4 व्हाइट ब्रेडच्या स्लाईसेस
1 कप साखर
काजू , बदाम आणि पिस्ता बारीक चिरून काप किंवा पावडर
5 – 7 केशराच्या काड्या
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर

कृती –
ब्रेडच्या कडा काढून मिक्सरमध्ये क्रंब्ज करून घ्या.
नाॅनस्टिक पॅनमध्ये किंवा जाड बुडाच्या कढईत दूध उकळायला ठेवा.
दुधाला एक उकळी आली की त्यात साखर, ब्रेड क्रंब्ज आणि केशराच्या काड्या घाला.
ढवळून साखर विरघळू द्या.
थोडासा सुकामेवा हवा असल्यास वरून घालायला बाजूला ठेवा.
राहिलेला सुकामेवा दुधात घाला.
10 – 15 मिनिटे मध्यम गॅसवर सतत ढवळत दूध आटवा आणि गॅस बंद करा.
बासुंदीत वेलची आणि जायफळ पावडर घाला व मिक्स करा.
खायला घेताना वरून बाजूला काढून ठेवलेला सुकामेवा घाला.
आवडीप्रमाणे रबडी गरम खा किंवा फ्रिजमध्ये ठेऊन थंड करा.

2. कंडेंस्ड मिल्कची रबडी –

साहित्य –
1 ली दूध (शक्यतो फुल क्रिम, होल मिल्क)
1 कप गोड, साखर असलेले कंडेंस्ड मिल्क (1 टिन/400ग्रॅम)
काजू , बदाम आणि पिस्ता बारीक चिरून काप किंवा पावडर
5 – 7 केशराच्या काड्या
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर

कृती –
नाॅनस्टिक पॅनमध्ये किंवा जाड बुडाच्या कढईत दूध उकळायला ठेवा.
दुधाला एक उकळी आली की त्यात स्वीटन्ड कंडेंस्ड मिल्क आणि केशर घाला आणि ढवळा.
कंडेंस्ड मिल्कमध्ये असलेल्या साखरेमुळे बासुंदी व्यवस्थित गोड होते.
पण जास्त गोड आवडत असेल तर वरून थोडीशी साखर घाला.
थोडासा सुकामेवा हवा असल्यास वरून घालायला बाजूला ठेवा.
राहिलेला सुकामेवा दुधात घाला.
10 – 15 मिनिटे मध्यम गॅसवर सतत ढवळत दूध आटवा आणि गॅस बंद करा.
रबडीत वेलची पावडर आणि जायफळ पावडर घाला व मिक्स करा.
खायला घेताना वरून बाजूला काढून ठेवलेला सुकामेवा घाला.
आवडीप्रमाणे रबडी गरम खा किंवा थंड करून आस्वाद घ्या.

3. मिल्क पावडरची रबडी –

साहित्य –

1 ली दूध (शक्यतो फुल क्रिम)
1 कप मिल्क पावडर
1 कप साखर
काजू , बदाम आणि पिस्ता बारीक चिरून काप किंवा पावडर
5 – 7 केशराच्या काड्या
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर

कृती –
1 ली. दुधापैकी एक ते दोन कप दूध मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्या.
नाॅनस्टिक पॅनमध्ये किंवा जाड बुडाच्या कढईत राहिलेले दूध उकळायला ठेवा.
मिक्सरमध्ये काढलेल्या दुधात मिल्क पावडर घालून फिरवून घ्या.
म्हणजे गुठळ्या न होता मिश्रण छान एकजीव होईल.
दुधाला उकळी आली की त्यात हे मिश्रण, साखर आणि केशर घाला.
ढवळून साखर विरघळू द्या.
थोडासा सुकामेवा हवा असल्यास वरून घालायला बाजूला ठेवा.
राहिलेला सुकामेवा दुधात घाला.
10 – 15 मिनिटे मध्यम गॅसवर सतत ढवळत दूध आटवा आणि गॅस बंद करा.
रबडीत वेलची आणि जायफळ पावडर घाला व मिक्स करा.
मस्त दाट रबडी सुक्यामेव्याने सजवून सर्व्ह करा.

तुम्हाला थोडी कमी दाट अशा कन्सिस्टन्सीची बासुंदी हवी असेल तर घट्ट करण्यासाठीचे पदार्थ अर्ध्या प्रमाणात घ्या. जसे की –
2 ब्रेड स्लाइस
1/2 टिन मिल्कमेड
1/2 कप मिल्क पावडर
बासुंदी किंवा रबडी आपण पुरीबरोबर तर नेहमी खातोच. पण बासुंदी किंवा रबडी इतरही अनेक पक्वान्नांसाठी बेस म्हणून छान लागते. रसमलाई, अंगूर मलई, रबडी जिलबी, रबडी मालपुआ, शाही ब्रेड किंवा शाही तुकडा हे बासुंदीचा बेस असलेले पदार्थ खूप पाॅप्युलर आहेत. गुलाबजाम विथ रबडी हे अफलातून फ्युजन तो एक बार ट्राय करनेकी बनतीच है बाॅस!

3 Ways Instant and Quick Rabdi/Basundi Recipe – How to make Rabdi Quickly without Boiling Milk for An Hours

इंस्टंट रबडी रेसिपी, इंस्टंट बासुंदी रेसिपी, रबडी रेसिपी मराठी, बासुंदी रेसिपी मराठी, ब्रेड रबडी, मिल्कपावडर रबडी, मिल्कमेड रबडी, instant rabdi recipe, instant basundi recipe,
 

1. Rabdi/Basunfi with Bread –

Ingredients –
1 lit. milk (preferably full cream)
4 slices of white bread
1 cup sugar
Finely chop nuts cashews, almonds and pistachios
5 – 7 saffron sticks
1 tsp cardamom powder
1/4 tsp nutmeg powder

Directions –
Remove the edges of the bread and crumble in a grinder.
Bring the milk to a boil in a nonstick pan or in a thick-bottomed kadai.
Bring the milk to a boil, add sugar, bread crumbs and saffron strands.
Stir and let the sugar dissolve.
Keep aside some of the chopped nuts to garnish Rabdi.
Add the remaining nuts into the milk.
Stir the milk over medium heat for 10 – 15 minutes and turn off the heat.
Add cardamom and nutmeg powder to the rabdi and mix.
Garnish with chopped nuts and serve.
Eat rabbi hot as you like or keep it in the refrigerator and serve chilled.

2. Rabdi/Basundi with Sweetned Condensed Milk –

Ingredients –
1 lit. milk (preferably full cream, whole milk)
1 cup sweetened, condensed milk (1 tin / 400 g)
Finely chopped nuts almonds, cashews and pistachios
5 – 7 saffron strands
1 tsp cardamom powder
1/4 tsp nutmeg powder

Directions –
Bring the milk to a boil in a nonstick pan or in a thick-bottomed kadai.
Bring the milk to a boil, add sweetened condensed milk and saffron and stir.
The sugar in condensed milk makes basundi sweet.
But if you like more sweets, add a little sugar.
Keep aside some of the chopped nuts to garnish Rabdi.
Add the remaining nuts into the milk.
Stir the milk over medium heat for 10 – 15 minutes and turn off the heat.
Add cardamom powder and nutmeg powder and mix well.
When eating, add dried fruits set aside.
Eat rabbi hot or cold as you like.

3. Rabdi with Milk Powder –

Ingredients –
1 lit. milk (preferably full cream)
1 cup milk powder
1 cup sugar
Finely chopped nuts cashews, almonds and pistachios
5 – 7 saffron strands
1 tsp cardamom powder
1/4 tsp nutmeg powder

Directions –
Pour one to two cups of milk into the mixer jar.
Bring the remaining milk to a boil in a nonstick pan or in a thick-bottomed kadai.
Add milk powder to the millk wr have kept aside and blend together.
By doing this we will get smooth, lumps free mixture.
When the milk boils, add this mixture, sugar and saffron.
Stir and let the sugar dissolve.
Keep aside some of the chopped nuts to garnish Rabdi.
Add the remaining nuts into the milk.
Stir the milk over medium heat for 10 – 15 minutes and turn off the heat.
Add cardamom and nutmeg powder and mix well.
Garnish Rabdi/Basundi with chopped nuts and serve hot/warm or chilled as you like.


4 thoughts on “3 प्रकारची एकदम झटपट होणारी बासुंदी/रबडी रेसिपी

Leave a Reply