कुरकुरीत, चटकदार चिवडा आणि तोंडात विरघळणारे रवा बेसनाचे लाडू

Crispy and Crunchy Chivada/Flatten Rice Trail Mix and Mouth Melting Sooji – Besan Ladoo Recipe

चिवडा रेसिपी मराठी, चिवडा कसा करायचा, पातळ पोह्याचा चिवडा, रवा बेसन लाडू, रवा लाडू, बेसनाचे लाडू, लाडू रेसिपी, दिवाळीचा फराळ, फराळ रेसिपीज, खादाडी
दोन वर्षापूर्वी ह्या रेसिपीज मी ‘खादाडी’च्या fb पेजवर पोस्ट केल्या होत्या.
या वर्षीची आमची दिवाळी थोडी वेगळी आणि तेवढीच खासही. नेदरलँडला आल्यानंतरची पहिली दिवाळी म्हणून कायम लक्षात राहिल अशी. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो? दोन दिवसापासून घरात भरून राहिलेल्या खमंग आणि गोड सुवासामुळे मस्त दिवाळीचा फील येतो आहे.
चिवडा आपण नेहमी खायला म्हणून करतच असतो. तरीही फराळाचं करायच म्हटलं की पहिला नंबर चिवड्याचाच लागतो. लाडू प्रकारात मी या वर्षी रवा बेसनाचे लाडू केले. आज ह्याच दोन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

चिवडा

(साहित्य)-
चिवडा रेसिपी मराठी, शाही चिवडा रेसिपी, स्पेशल चिवडा रेसिपी, चिवडा कसा बनवायचा, पातळ पोह्याचा चिवडा
1/4 किलो पातळ पोहे
1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे
1/2 वाटी चिवड्याचं डाळं
1/2 वाटी सुक्या खोबर्‍याचे पातळ काप
कढीपत्ता आवडीप्रमाणे
1/4 वाटी काजूचे तुकडे
1/4 वाटी किसमिस
किंवा
1 – 2 टी स्पून साखर
2 टी स्पून पांढरे तीळ
1 टी स्पून ओवा
1/2 वाटी तेल
8 -10 हिरव्या मिरच्या
किंवा
2 टी स्पून लाल तिखट
फोडणीसाठी – मोहरी, हिंग, हळद
चवीप्रमाणे मीठ
कृती –
1 – 2 टीस्पून तेल घालून कढईत किंवा मायक्रोवेव्हमध्ये पोहे अगदी चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
कढीपत्ता आणि मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करा.
भाजलेले पोहे मोठ्या पातेल्यात किंवा भांड्यात काढून ठेवा.
आता कढईत थोडसं तेल गरम करा.
शेंगदाणे, डाळं, खोबर्‍याचे तुकडे, काजू आणि किसमिस एकेक करून तेलात खमंग परतून घ्या आणि पोह्यावर घाला.
कढीपत्ता आणि मिरच्या मिक्सरमध्ये चटणीच्या भांड्यात कोरड्या वाटून घ्या.
राहिलेलं तेल गरम करा.
तापलेल्या तेलात मोहरी, हिंग, तीळ आणि ओवा घाला.
मिरच्या आणि कढीपत्त्याचा वाटलेला गोळा घालून खमंग परतून घ्या.
सगळ्यात शेवटी हळद आणि तिखट घाला.
फोडणीतच चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून त्यावर पोहे घाला.
तयार चिवडा मंद आचेवर 5 मिनिटं परतून घ्या म्हणजे झकास कुरकुरीत होतो.मायक्रोवेव्हमध्येही परतल्यास खूपच कुरकुरीत होतो.
शेंगदाणे, खोबरं, डाळं इ. एकेक करून परतल्यास तेल थंड न होता खमंग फोडणी करता येते.
मी मिरच्या आणि कढीपत्ता वाटून घालते. म्हणजे खाताना काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय चवही छान येते.
काजू आणि किसमिस आवडत असल्यास घाला.
अजिबात गोडट चव नको असेल तर साखर नाही घातली तरी चालेल.
लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घालताना, दोन्ही थोडं थोडं किंवा एकच काहीतरी घातलं तरी चालेल.
खोबरं मी यावेळेस चिवडा करताना घातलं नाही कारण काप करायला मला विळीचं लागते.

रवा बेसन लाडू

(साहित्य) –
रवा बेसनाचे लाडू, लाडू कसे करायचे, सोपी लाडू रेसिपी, रवा लाडू, बेसन लाडू, दिवाळीचा फराळ, लाडू मिठाई
2 वाट्या बारीक रवा
1 वाटी चणा डाळीचं पीठ (बेसन)
1 वाटी साजूक तूप
2 वाट्या साखर
1 वाटी पाणी
काजू, किसमिस, बदाम, पिस्ता
इ. सुकामेवा
वेलची पूड
कृती –
नाॅनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईत साजूक तूप गरम करा.
त्यात रवा घालून खरपूस, बदामी रंगावर, हलका होईपर्यंत भाजा.
रवा भाजून होत आला कि त्यातच बेसन घालून खमंग, तूप सुटेपर्यंत भाजा.
रवा आणि बेसन भाजण्यावरच या लाडूची चव अवलंबून आहे.
भाजताना गॅस मंद ठेवा.
एकीकडे दुसर्‍या पातेल्यात साखरेचा पाक करायला घ्या.
एकतारी पाक करा.
पाक झाल्यावर गॅस बंद करून पाकात वेलची पूड घाला, रवा बेसनही घाला.
बारीक तुकडे करून सुकामेवा घाला.
सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून झाकण ठेवा.
गार होईल तसे मिश्रण आळत(घट्ट होत) जातं.
पूर्ण आळलं की लाडू वळा.
वळताना प्रत्येक लाडूमध्ये किसमिस घाला.
हे लाडू मऊसर होतात आणि तसेच अप्रतिम लागतात.
मिश्रण आळायला जेवढा जास्त वेळ लागेल तेवढे छान लागतात.
मी दुपारी रवा पाकात घातल्यानंतर रात्री लाडू वळले.
माझा पाक थोडासा सैल झाला होता, त्यामुळे मी अर्धी वाटी रवा कोरडा, खरपूस भाजून मिश्रणात घातला.
लाडू एकदम छान झाले.
पाक जास्त घट्ट झाला तर लाडू कोरडे, भगराळ होतात.
अश्या वेळेस थोडसं गरम दूध घालून लाडू वळा.
सगळ्यांना दिवाळीच्या, चिवड्यासारख्या चटकदार, लाडूसारख्या गोड गोड, चकलीसारख्या कुरकुरीत आणि शंकरपाळ्यासारख्या खुसखुशीत खूप खूप शुभेच्छा.
दिवाळीच्या फराळाचे काही पदार्थ –

Crispy Chiwda and Mouth Melting Rava/Sooji – Besan Ladoo

chiwda recipe marathi, crispy chiwda recipe in english, sooji besan ladoo, rava ladoo, sooji ladoo, how to make ladoo mithai, besan ladoo, diwali snacks, diwali sweets

Ingredients –
1/4 kg thin poha
1/2 cup roasted peanuts
1/2 cup Chiwda dal/roasted and splited gram/daria
1/2 cup thin slices of dried coconut
Few curry leaves
1/4 cup cashew nuts
1/4 cup raisins
Or
1 – 2 tsp sugar
2 tsp white sesame seeds
1 tsp ajwain/carrom seeds
1/2 cup oil
8 -10 green chillies
Or
2 tsp red chili powder
For tadka – mustard seeeds, asafoetida, turmeric
Salt to taste
Directions –
Add 1 – 2 tsp oil and fry poha in a pan or microwave till it becomes crispy.
Wash and dry the curry leaves and chillies.
Place the roasted poha in a large bowl or pot.
Now heat a little oil in a pan.
Fry the peanuts, roasted gram, coconut pieces, cashews and raisins one by one in oil and add to the poha.
Grind the curry leaves and chillies in a chutney jar in a grinder without adding water.
Heat the remaining oil.
Add mustard seeds, asafoetida, sesame seeds and ajwain in the heated oil.
Add chillies and curry leaves and saute.
Finally add turmeric powder and chili powder.
Add sugar and salt to in this tadka.
Now add roasted poha to the tadka and mix well.
Saute the prepared Chiwda on low flame for 5 minutes so that it becomes crispy.

Semolina Besan Ladoo

Ingredients –
2 cups fine semolina
1 cup gram gram flour
1 cup Ghee
2 cups sugar
1 cup water
Chopped cashews, raisins, almonds, pistachios
Cardamom powder
Directions –
Heat ghee in a nonstick pan or skillet.
Add semolina and fry till it becomes light brown.
Once the semolina is being roasted, add gram flour and roast again till becomes golden brown.
The taste of this laddu depends on the roasting of semolina and gram flour.
Keep the heat slow while roasting.
Now we have to make sugar syrup or chasni.
Take two cups of sugar in a pan and add a cup of water in it.
Continusely stirring bring this mixture to boil on medium to high heat.
When you see boil in the syrup immediately turn the heat very low.
Now keep checking.
After 3 to 5 minutes take some cooled of sugar surup in between your fingers, press and now open your fingers, if it forms a thick string between your fingers 1 string sugar chashni is ready to use.
Now turn off the heat and add cardamom powder and roasted semolina besan.
Add chopped nuts and raisins according to your choice.
Stir the mixture well and keep the lid on.
As it cools, the mixture thickens.
After 2 to 4 hours mixture will thicken sufficiently to shape the ladoos.
Some time it may take long time (more than 4 hours) to thicken up the the ladoo mixture.
Some extra tips for chashni –
If your chashni didn’t come out well it will end up to a soft, halwa like mixure.
In that case add some roasted semolina to the mixture.
In case your chasni is over cooked and ladoos become little hard, you can add some hot milk or ghee to adjust the consistency.

2 thoughts on “कुरकुरीत, चटकदार चिवडा आणि तोंडात विरघळणारे रवा बेसनाचे लाडू

Leave a Reply