मेतकूट – विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ

मेतकूट – विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ

Maharashtrian Style Dry Chutney/Podi Powder – Grandma’s Recipe – Metkoot

मेतकूट रेसिपी, मेतकूट कसे करायचे, पारंपारिक मराठी पदार्थ, कोकणी पदार्थ, तोंडीलावणे, कोरड्या चटण्या, टिकाऊ चटणी, प्रवासासाठी टिकाऊ पदार्थ, maharashtrian metkoot recipe, chutney recipe, dry chutney recipe, podi recipe maharashtrian style, multipurpose podi recipe, authentic marathi food
माझ्या आजोबांना (आईचे वडिल), जाऊनही आता 12 वर्ष झाली. ते नेहमी म्हणायचे हल्ली साखरेच्या नावाने इतका आरडाओरडा करतात. पण पूर्वीच्या काळी साधा एक कप चहा करायचा झाला तरी, विहिरीवर जाऊन पाणी आणा, गोठ्यात जाऊन दूध काढून आणा, लाकडं फोडा, चूल पेटवा तेव्हा कुठे कपभर चहा व्हायचा आणि या सगळ्यात त्या चहातली चमचा दोन चमचे साखर कुठल्या कुठे जिरून जायची. याचा मतितार्थ लक्षात घेतला तर ते खरंच होतं. पूर्वीच्या काळी लोकांची जीवनशैली बैठी नसून, कष्टाची होती. शिवाय लोकं स्थानिक पातळीवर पिकणारे सकस अन्न खात होते.

कोकणातला असाच एक पारंपारिक पदार्थ म्हणजे मेतकूट. सकाळी ब्रेकफास्टसाठी, म्हणजे दुपारच्या जेवणाआधी दिवसाची सुरवात करताना मऊभात- तूप – मीठ- मेतकूट अशा आहाराची योजना करण्यामागे आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी नेमकी दिसून येते. घरच्या तांदळाचा मऊभात किंवा पेज, गरम आणि दमट हवामानात पचायला हलका असा पदार्थ. सर्वोत्तम असा उच्च दर्जाच्या फॅटचा सोर्स असणारे साजूक तूप आणि वर मेतकूट. मिक्स डाळींमधून शाकाहारी माणसाला मिळणारं प्रोटीन आणि ते सुद्धा डाळी भाजून पचायला सोप्या असणार्‍या पद्धतीने केलेलं. या मेतकूटाची कृती देखील तितकीच सोपी आहे. कसं करायच ते बघू या.

साहित्य –
1 वाटी चण्याची डाळ
1/2 वाटी मुगाची डाळ (पिवळी, साल नसलेली)
1/2 वाटी उडदाची डाळ
1/4 वाटी तांदूळ
1/4 वाटी गहू किंवा कणिक
1 टी स्पून लाल तिखट किंवा 3 – 4 लाल सुक्या मिरच्या
1 टे स्पून जिरे
1 टी स्पून धणे
1 टी स्पून हळद
1 टी स्पून हिंग
1 टी स्पून सुंठ पावडर

1 टी स्पून मेथीदाणे
1/2 टी स्पून काळी मिरी
मेतकूट रेसिपी, मेतकूट कसे करायचे, पारंपारिक मराठी पदार्थ, कोकणी पदार्थ, तोंडीलावणे, कोरड्या चटण्या, टिकाऊ चटणी, प्रवासासाठी टिकाऊ पदार्थ, maharashtrian metkoot recipe, chutney recipe, dry chutney recipe, podi recipe maharashtrian style, multipurpose podi recipe, authentic marathi food

कृती –
चणा डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ कढईत वेगवेगळी खमंग भाजून घ्या.
प्रत्येक डाळ भाजून झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्या.
तांदूळ आणि गहू/कणिकही भाजून घ्या.
हिंग, हळद आणि सुंठ पावडर सोडून बाकी सगळे मसाल्याचे पदार्थ खमंग कोरडेच भाजून घ्या.

मेतकूट रेसिपी, मेतकूट कसे करायचे, पारंपारिक मराठी पदार्थ, कोकणी पदार्थ, तोंडीलावणे, कोरड्या चटण्या, टिकाऊ चटणी, प्रवासासाठी टिकाऊ पदार्थ, maharashtrian metkoot recipe, chutney recipe, dry chutney recipe, podi recipe maharashtrian style, multipurpose podi recipe, authentic marathi food

भाजलेले सगळे पदार्थ गार झाले की मिक्सरमध्ये अगदी बारीक पीठ किंवा किंचीत रवाळ असे दळून घ्या.
दळून झाल्यावर हिंग, हळद आणि तिखट घालून मिक्स करा.
एअर टाइट डब्यात भरून कोरड्या जागी ठेवा.

Metkoot Recipe in English

अगदी लहान मुलांसाठी, आजारी माणसाला पथ्यासाठी किंवा बाळंतिणीसाठी मेतकूट करायचे असेल तर तिखट किंवा मिरच्या अजिबात घालू नका.
अख्ख्या मसाल्यांच्या ऐवजी तुमच्याकडे मसाल्यांच्या पावडरी असतील तर त्याही घेतल्या तरी चालतील.
मग त्या डाळी भाजून झाल्यावर गॅस बंद करून तापलेल्या कढईत फक्त गरम करून घ्या.
मेतकूट करताना वापरायचे साहित्य आणि त्याचे प्रमाण आवडीनुसार बदलता येते.
माझी आजी जे मेतकूट करायची ते अगदी बारीक पिठासारखे असायचे.
पण आवडत असेल तर मेतकूट किंचीत रवाळ दळले तरी चालेल.
तुम्हाला एकंदर तयार मेतकूट किती हवे आहे त्या मानाने लहान, मोठी वाटी घ्या.
त्याच वाटीने सगळे प्रमाण मोजून घ्या.

मऊभात, मेतकूट, तूप तर आपण खातोच.
पण त्याबरोबरच मेतकूट हे कोरडे मल्टिपर्पज तोंडीलावणे असल्यामुळे कधीही पटकन उपयोगी पडते.
मेतकूट जास्त प्रमाणात केले असल्यास पीठ पेरून भाजी करताना नेहमीच्या फक्त बेसनाऐवजी मेतकूट वापरले तर भाजी जास्त चविष्ट लागते.
मेतकूटात तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून पोळी, भाकरी किंवा इडली, डोश्याबरोबर खायला झटपट चटणी तयार होते.
तेलाऐवजी मेतकूट दह्यात कालवले तरी छान लागते.
मेतकूट दह्यात कालवून वरून फोडणी दिलेले डांगर तर चवीला अप्रतिम लागते

2 thoughts on “मेतकूट – विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ

Leave a Reply