मकर संक्रांतीसाठी तिळाचे मऊ लाडू

Makar Sankranti Special Soft Sesame/Til Ladoo Recipe

मकर संक्रांतीसाठी तिळाचे मऊ लाडू

मकर संक्रांत 14 तारखेला असली तरी आपण रथसप्तमीपर्यंत ती साजरी करतोच. तेवढेच तीळगूळ आणि गुळाच्या पोळ्या खायला निमित्त. संक्रांतीला आपण तिळाचे लाडू करतो त्याचे जनरली दोन प्रकार असतात. चिक्कीचा गूळ घालून केलेले कडक लाडू आणि दुसरा प्रकार म्हणजे तिळाचे मऊ लाडू. ह्या दोन्ही प्रकारांशिवाय तिळाच्या वड्या किंवा कधी कधी नुसतेच तीळकूटही काही ठिकाणी देतात. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ गरम प्रकृतीचे असल्यामुळे हिवाळ्यात येणार्‍या संक्रांतीसाठी तीळगूळ खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्याशिवाय तिळात असणार्‍या नैसर्गिक तेलामुळे थंडीत त्वचेला आवश्यक असणारी स्निग्धताही मिळते. याचे कारण तिळात भरपूर प्रमाणात असणारे ‘ई’ व्हिटॅमीन.

आज आपण तिळाचे मऊ लाडू कसे करायचे ते बघू या. तिळाचे हे लाडू करायला खूप सोपे आहेत. हे लाडू करताना पाक करावा लागत नाही. त्यामुळे हे लाडू त्यामानाने पटकन होतात आणि खायलासुद्धा मस्त खमंग लागतात.

साहित्य –
2 कप तीळ (पांढरे किंवा पाॅलिश न केलेले, आवडीप्रमाणे)
1 कप शेंगदाणे
1 कप सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट
31/2 ते 4 कप बारीक चिरलेला गूळ (साधा, चिक्कीचा नको)
1 टी स्पून भरून वेलची पूड
1 – 2 टे स्पून दूध किंवा तूप

कृती –
तीळ खमंग होईपर्यंत चांगले लालसर रंगावर भाजून घ्या.

मकर संक्रांत, तिळाचे लाडू, तिळाचे मऊ लाडू, तीळगूळ, लाडू रेसिपी, सोपे लाडू, गुळाचे लाडू, पाकाशिवाय लाडू, makar sankranti, tilache ladoo, tilgulache ladoo recipe, soft sesame ladoo, til ke ladoo

भाजताना गॅस मंद ते मध्यम ठेवा.
तीळ व्यवस्थित भाजले गेले की तडतडायला लागतील.
त्यानंतर तीळ काढून घेऊन ताटात थंड करायला ठेवा.
सुकं खोबरं आणि शेंगदाणेसुद्धा एकेक करून खमंग भाजून घ्या.

मकर संक्रांत, तिळाचे लाडू, तिळाचे मऊ लाडू, तीळगूळ, लाडू रेसिपी, सोपे लाडू, गुळाचे लाडू, पाकाशिवाय लाडू, makar sankranti, tilache ladoo, tilgulache ladoo recipe, soft sesame ladoo, til ke ladoo

तीळ कोमट असतानाच मिक्सरमधून ओबडधोबड कूट करून घ्या.
शेंगदाण्याचेही बारीक कूट करून घ्या.
शेंगदाण्याचे कूट करताना सालं काढली नाही तरी चालेल.
आता तीळकूटातले साधारण पाव कप तीळकूट बाजूला काढून ठेवा.

मकर संक्रांत, तिळाचे लाडू, तिळाचे मऊ लाडू, तीळगूळ, लाडू रेसिपी, सोपे लाडू, गुळाचे लाडू, पाकाशिवाय लाडू, makar sankranti, tilache ladoo, tilgulache ladoo recipe, soft sesame ladoo, til ke ladoo

रलेले तीळकूट, दाण्याचे कूट, सुकं खोबरं आणि बारीक चिरलेला गूळ हे सगळे एकत्र करा.

मकर संक्रांत, तिळाचे लाडू, तिळाचे मऊ लाडू, तीळगूळ, लाडू रेसिपी, सोपे लाडू, गुळाचे लाडू, पाकाशिवाय लाडू, makar sankranti, tilache ladoo, tilgulache ladoo recipe, soft sesame ladoo, til ke ladoo

यातले एका वेळेस थोडे थोडे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून एकजीव, मऊ करा.
सगळे मिश्रण फिरवून झाले की त्यात बाजूला काढून ठेवलेले तीळकूट आणि वेलची पावडर घाला.

मकर संक्रांत, तिळाचे लाडू, तिळाचे मऊ लाडू, तीळगूळ, लाडू रेसिपी, सोपे लाडू, गुळाचे लाडू, पाकाशिवाय लाडू, makar sankranti, tilache ladoo, tilgulache ladoo recipe, soft sesame ladoo, til ke ladoo

थोडसं तीळकूट वरून घातल्याने लाडवात अख्खे तीळ दिसायला चांगले दिसतात व बाकीचे मिश्रण गुळगुळीत, एकजीव वाटले तरी चालते.
आता या मिश्रणात दूध किंवा तूप कडकडीत गरम करून घाला.
सगळं साहित्य व्यवस्थित मळून घ्या आणि छोटे छोटे लाडू वळा.

मकर संक्रांत, तिळाचे लाडू, तिळाचे मऊ लाडू, तीळगूळ, लाडू रेसिपी, सोपे लाडू, गुळाचे लाडू, पाकाशिवाय लाडू, makar sankranti, tilache ladoo, tilgulache ladoo recipe, soft sesame ladoo, til ke ladoo

तिळाचे लाडू करताना पाॅलिश न केलेले तीळ घेतल्यास लाडू जास्त खमंग आणि पौष्टिक होतात.
पण साधे तीळ खमंग भाजताना लाडवांचा रंग काळपट होतोच.
घरी जर खोडकर मंडळी असली तर कधी कधी चव न बघता रंग बघूनच खायला खळखळ करतात.🙂
त्यामुळे लाडू करताना पांढरे किंवा बिन पाॅलिशचे तीळ आवडीप्रमाणे घ्या.
तीळाचे लाडू करताना तीळ जर चांगल्या प्रतीचे नसतील तर मिक्सरमध्ये फिरवूनही तेल सुटत नाही.
वाटलेले मिश्रण मिळून न येता कोरडेच राहते.
त्याचे लाडू वळायला त्रास होतो.
अशा वेळेस थोडासा दुधाचा शिपका दिला किंवा तूप घातले तर लाडू वळायला जोर लागत नाही व हातही दुखत नाहीत.
दूध किंवा तूप घालताना ते व्यवस्थित गरम करून घाला.
टिकण्याच्या दृष्टीने दूध घालायचे की तूप हे हवामानानुसार ठरवा.
तुम्ही राहात असलेल्या ठिकाणी खूप थंडी नसेल, तर दूध घातलेले लाडू खराब होण्याची शक्यता असते.

या ब्लाॅगवरील लाडूच्या आणखी काही रेसिपीज –
 
2 thoughts on “मकर संक्रांतीसाठी तिळाचे मऊ लाडू

Leave a Reply