Kachori Style Spicy Mutter/Green Peas Paratha – Stuffed Flatbread

मटारचे कचोरी स्टाईल मसालेदार पराठे:

मटार पराठा, मटार कचोरी, मटार रेसिपीज, पराठा रेसिपीज, मटार, ब्रेकफास्ट रेसिपीज,भाज्यांचे प्रकार,
मागच्या आठवड्यात शेवटी जे व्हायला नको ते झालंच. इतकी सगळी काळजी घेऊन देखील कुठेतरी काहीतरी चुकलंच. चौघेही पाॅझिटिव्ह. पण सुदैवाने थोडक्यात निभावलं. लक्षणं खूप तीव्र नव्हती. पहिले 3 – 4 दिवस जास्त त्रास झाला. पण ठिक आहे. 8 – 10 दिवस भरपूर आराम केल्यावर आता जवळ जवळ पूर्ण बरं वाटतय म्हणण्यासारखी तब्येत आहे. सो पुनश्र्च हरी ओम!🙂
 
तुम्हाला हा अनुभवही वाचायला आवडेल –
 

त्यामुळे आता तोंडाला जरा चव हवी असं वाटायला लागलं. मस्त काहीतरी चटपटीत खायचं होतं आणि तळण करायचा तर प्रश्नच नव्हता. म्हणून मग मटारचे हे पराठे केले. मटार करंजी, मटार कचोरी हे सगळे प्रकार मटारच्या सिझनमध्ये आवर्जून केले जातातच. पण हे सगळे झाले तळणाचे प्रकार. पण तुम्हाला जर तेलकट खायचं नाहीये आणि चवीतही तडजोड करायची नसेल तर मटारचे हे कचोरी स्टाईल पराठे करूनच बघा. अगदी मटारची कचोरी किंवा करंजी खात आहोत असेच वाटेल.

 
पराठ्याच्या याही रेसिपीज अवश्य बघा –
5 प्रकारचा सोपा आणि झटपट होणारा पुदिना पराठा

तयार पराठे – 8 ते 10 पराठे

 

साहित्य – सारणासाठी –

21/2 कप मटार (ताजे किंवा फ्रोजन)
थोडीशी निवडलेली कोथिंबीर
2 हिरव्या मिरच्या
लहानसा आल्याचा तुकडा

पराठ्यासाठी कणकेची पारी –

21/2 कप कणिक किंवा 2 कप कणिक + 1/2 कप मैदा
1/2 टी स्पून मीठ
1/4 कप तेल
कणिक भिजवण्यासाठी पाणी

सारणासाठी मसाला –

1 टे स्पून तेल
1/2 टी स्पून जिरं
1/4 टीस्पून हिंग
1 टे स्पून धणेपूड
1 टीस्पून लाल तिखट
1/2 टी स्पून हळद
2 टीस्पून चाट मसाला
1/2 टीस्पून भाजलेल्या जिर्‍याची पावडर
1/2 टीस्पून गरम मसाला
1 टीस्पून बडीशोप पावडर
2 टेस्पून डाळीचे पीठ (बेसन)
1/2 टीस्पून साखर
चवीनुसार मीठ

कृती – मटार पेस्ट –

मटार पराठा, मटार कचोरी, मटार रेसिपीज, पराठा रेसिपीज, मटार, ब्रेकफास्ट रेसिपीज,भाज्यांचे प्रकार,

फ्रोजन मटार असतील तर ते गरम पाण्यातून काढून थाॅ करून घ्या.
कोथिंबीरही स्वच्छ धुऊन घ्या.
पेस्ट करण्याआधी मटार आणि कोथिंबीर, आलं, मिरच्या पूर्णपणे कोरड्या करा.
आता मटार, कोथिंबीर, आलं आणि मिरच्या पाणी न घालता वाटून घ्या.
मटारची अगदी बारीक पेस्ट करा.
म्हणजे सारण भरायला सोपे पडेल.

कणिक भिजवणे –

मटार पराठा, मटार कचोरी, मटार रेसिपीज, पराठा रेसिपीज, मटार, ब्रेकफास्ट रेसिपीज,भाज्यांचे प्रकार,

कणकेत तेल आणि मीठ घालून कणिक मऊ पण फार सैल राहणार नाही इतपत भिजवा.
साधारण 1 कप पाणी लागेल.
भिजवलेली कणिक झाकून ठेवा.

सारणासाठी मसाला तयार करणे –

मटार पराठा, मटार कचोरी, मटार रेसिपीज, पराठा रेसिपीज, मटार, ब्रेकफास्ट रेसिपीज,भाज्यांचे प्रकार,

तेल, जिरं, हिग,मीठ, साखर आणि बेसन सोडून बाकीच्या मसाल्यांच्या पावडरी एका वाटीत मिक्स करा.

मटार पराठा, मटार कचोरी, मटार रेसिपीज, पराठा रेसिपीज, मटार, ब्रेकफास्ट रेसिपीज,भाज्यांचे प्रकार,

पॅनमध्ये एक टेस्पून तेल गरम करा.
तेल तापले की त्यात जिरं घाला.
जिरं तडतडलं की त्यात हिंग घाला.
त्यावर एकत्र केलेल्या मसाल्याच्या पावडरी घालून दोन मिनिटे परता.
आता बेसन घालून परता.
बेसन छान खमंग परता.
बेसन चांगले परतले गेले की त्यात मीठ आणि साखर घालून मिक्स करा.
या मसाल्यांवर वाटलेली मटारची पेस्ट घालून परता.
मटारच्या पेस्टमध्ये मसाले नीट मिक्स झाले की गॅस बंद करा.
पराठे करण्याआधी सारण अगदी थंड करा.

पराठे करण्यासाठी –

मटार पराठा, मटार कचोरी, मटार रेसिपीज, पराठा रेसिपीज, मटार, ब्रेकफास्ट रेसिपीज,भाज्यांचे प्रकार,

सारण व्यवस्थित थंड झाल्यावर पराठे करायला घ्या.

कणकेचा एक गोळा घेऊन तो पोळपाटावर थोडासा लाटून घ्या.
त्यावर मटारच्या सारणाचा गोळा ठेऊन बंद करा.
हलक्या हाताने पराठा लाटा.
तवा तापला की दोन्ही बाजूंनी तेल सोडून पराठे खमंग भाजा.
 
मटारचे हे पराठे नक्की करून बघा. तुम्हाला पराठे आवडले का हे मला कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या सूचना आणि अभिप्रायांच स्वागत आहे. रेसिपी आवडल्यास तुमचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. नव्या रेसिपीसह लवकरच भेटू. तोपर्यंत लोभ असावा हिच विनंती!

2 thoughts on “Kachori Style Spicy Mutter/Green Peas Paratha – Stuffed Flatbread

Leave a Reply